आमच्याविषयी

जीवनविकास विद्यामंदिर हायस्कूल, सासुरे

ग्रामविकास मंडळ, सासुरे (ता. बार्शी, जि. सोलापूर) संचलित जीवनविकास विद्यामंदिर हायस्कूल, सासुरे ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली एक गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्था आहे. या विद्यालयाची स्थापना सन 1984 मध्ये तत्कालीन अध्यक्ष श्री बिभीषण पाटील व सचिव श्री महमद शेख तसेच इतर संचालक यांच्या दूरदृष्टीतून करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली.

शाळेच्या या शैक्षणिक प्रवासात माढा तालुक्यातील केवड येथे भैरवनाथ प्रशाला ही दुसरी शाखा देखील स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सद्यस्थितीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार करंडे व सचिव श्री रामचंद्र आवारे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली जीवनविकास विद्यामंदिर हायस्कूल शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे.

विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तासिका, शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन, तसेच विविध शालेय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग यावर विशेष भर दिला जातो. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये पात्र ठरले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम, कला व हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच सामाजिक उपक्रमांचा समावेश असून, यामुळे शिक्षण अधिक आनंददायी, सृजनशील व व्यावहारिक बनते. आजच्या आधुनिक युगाशी सुसंगत राहण्यासाठी शाळेतील सर्व वर्ग डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यात आले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार व सामाजिक जाणीव निर्माण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या विद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा तसेच अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये यशस्वी करिअर घडवले आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

40
+ वर्षांची शैक्षणिक परंपरा
3500
+ यशस्वी विद्यार्थी
10
+ अनुभवी शिक्षक व कर्मचारी
30
+ पुरस्कार जिंकले
आमची वैशिष्ट्ये

पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचे यश

शिष्यवृत्ती यश

शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी.

अनुभवी शिक्षक

मार्गदर्शनासाठी कुशल आणि अनुभवी शिक्षकवृंद.

डिजिटल वर्ग

स्मार्ट व डिजिटल क्लासरूममधून आधुनिक शिक्षण.

अतिरिक्त तासिका

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर अभ्यासाची संधी

क्रीडा सुविधा

खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ व विविध मैदानी खेळांसाठी सुविधा.

सांस्कृतिक उपक्रम

नाटिका, सण साजरे करणे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

सुरक्षित वातावरण

शिस्तबद्ध, सुरक्षित व स्वच्छ शाळा परिसर.

सर्वांगीण विकास

शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची घडण.

शालेय उपक्रम

जीवनविकास विद्यामंदिर हायस्कूल, सासुरे येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबवले जातात.

शैक्षणिक उपक्रम

  • शब्दभेंड्या
  • प्रश्नमंजुषा
  • चित्रकला
  • विज्ञान प्रयोग व प्रकल्प
  • शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन

क्रीडा उपक्रम

  • खो-खो
  • कबड्डी
  • बुद्धिबळ
  • कुस्ती
  • मैदानी व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

सांस्कृतिक उपक्रम

  • विविध सण साजरे करणे
  • नाटिका व एकांकिका
  • गीत स्पर्धा
  • नृत्य स्पर्धा
  • भाषण स्पर्धा

कला व हस्तकला

  • रांगोळी
  • मातीकाम
  • सजावटीच्या वस्तू तयार करणे

सामाजिक उपक्रम

  • वृक्षारोपण
  • स्वच्छता मोहीम
  • सामाजिक प्रबोधन उपक्रम

विश्वस्त मंडळ

संस्थापक

श्री बिभीषण पाटील (माजी अध्यक्ष)
श्री महमद शेख (माजी सचिव)

सध्याचे नेतृत्व

: अध्यक्ष: डॉ. अजयकुमार महादेव करंडे
सचिव: श्री. रामचंद्र भीमराव आवारे
संचालक: श्री मनोहर निवृत्ती दळवी
संचालक: श्री शहाजी तुळशीराम नेमाने

संचालिका: सौ. चंद्रकला सुग्रीव दळवी
संचालक: श्री रामचंद्र ज्योतीराम करंडे
संचालक: श्री बाळासाहेब बिभीषण पाटील
संचालक: श्री बापूसाहेब शहाजी नेमाने
संचालिका: सौ. सारिका अजयकुमार करंडे
संचालक: श्री सचिन महादेव करंडे
संचालिका: सौ. सुकन्या सचिन करंडे
संचालक: श्री किशोर महादेव करंडे
संचालक: श्री. तात्यासाहेब बाबा करंडे
संचालक: श्री प्रशांत अर्जुन भारती
संचालक: श्री अमोल दिगंबर सातपुते